चेन्नई : द्रमुकचे ज्येष्ठ नेते के. अंबाझहगन यांचे येथे शनिवारी निधन झाले. ते 97 वर्षांचे होते.
अंबाझहगन हे द्रमुकचे सर्वात ज्येष्ठ नेते होते. पक्षाचे अध्वर्यू कै. एम करूनानिधी यांचे जवळचे मित्र होते. गेले काही दिवस वृध्दापकाळातील प्रकृतीच्या तक्रारीमुळे त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 24 फेब्रुवारीला त्यांची प्रकृती ढासळली होती, असे द्रमुकचे प्रमूख एम. के. स्टॅलीन यांनी सांगितले.
नऊ वेळा आमदार बनलेले अंबाझहगन हे पक्षाचे गेले 43 वर्ष सरचिटणीस होते. आजारपणामुळे ते सध्या सक्रीय राजकारणापासून दूर होते. स्टॅलीन यांनी निवेदनात म्हटले आहे की, अंबाझहगन यांचे रात्री एक वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यामुळे पक्षाचे ध्वज सात दिवस अर्ध्यावर ठेवण्यात येतील.
द्रमुकच्या परिवारात प्राध्यापक म्हणून ओळखअसणारे अंबाझहगन यांनी तामिळनाडूचे अर्थमंत्री आणि समाज कल्याण मंत्री सेवा बजावली होती.