Diwali 2021 Fashion Tips : दिवाळीत स्टायलिश दिसण्यासाठी परिधान करा खास साडी

पुणे – स्त्रीवर खुलून दिसणारा पेहराव म्हणजे साडी. खरंतर साडीही एक दागिनाच. साडी सर्वच सणाला नेसली जाते. पण दिवाळीत विशेष महत्त्व आहे. दिवाळीत साडी नेसल्यामुळे खास लूक

मिळतो बनारसी साडी भरजरी आणि वजनाला जड असली तरी दिवाळीत तुम्हाला खास लूक हवा असल्यास बनारसी साडी नेसा. बनारसी साडीमध्ये अनेक प्रकार आहेत. 

सिल्कप्रमाणेच कॉटन सिल्क हा प्रकार आहे. या साड्या वजनाला हलक्‍या असतात. अशा साड्यांमध्ये वावरणं सोपं असते त्यामुळे सणाचा आनंद घेता येतो. काठापदरच्या पारंपरिक साड्या नेसून खास लूक मिळवू शकता. 

हिरव्या आणि निळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेली ग्रीन मैसूर सिल्क साडी खुलून दिसते. प्रिंटेड पण डिसेंट लुकची साडी खरेदी करण्याची इच्छा असेल तर ग्रीन आर्ट सिल्क प्रिंडेट बागलपुरी साडी ट्राय करा. 

कांजिवरम ही साडी प्रत्येकीला हवी असते. कांजिवरम साडी सणासुदीला आणि लग्नकार्यात नेसली जाते. जर तुम्हाला काठापदराची कांजिवरम नको असेल तर यंदाच्या दिवाळीला तुम्ही बिनकाठाची ब्लू प्रिंट ब्लेंड प्रिंटेड कांजिवरम साडी परिधान करू शकता. 

प्युअर सिल्क चंदेरी साडीची बातच न्यारी आहे. कारण चंदेरी साडी सर्वांवर खुलून दिसते. आकाशी रंगाची प्युअर सिल्क चंदेरी साडी दिवाळसण नक्कीच खास करू शकेल. 

पोचमपल्ली पटोला साडी अनेक महिलांच्या आवडीची आहे. पटोलासाडीच्या लूकमुळे एकतरी प्युअर पटोला आपल्याकडे असावी. कलमकारी प्रिंट हवे असेल तर कलमकारी केरला प्रिंटची साडी नक्‍की परिधान करा.

 हातमागावरण विणलेल्या कॉटन लीनन साड्या सध्या फारच ट्रेंडमध्ये आहेत. या साडीने तुमचा लुक ट्रेंडी करू शकता. कांथा वर्कच्या साड्याही लोकप्रिय आहे.आवडतातच. प्युअर सिल्कची कांथावर्क साडी तुमची शान वाढवेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.