चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि.चा उपक्रम : जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन
पुणे – मासिक पाळी काळातील स्वच्छता ही भीषण समस्या आहे. एका अंदाजानुसार, आजही महाराष्ट्रातील केवळ 17 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. ही समस्या ओळखून चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. यांनी जागतिक महिला दिनापासून सुरू केलेला “मिशन आद्या’ उपक्रमांतर्गत दोन लाख सॅनिटरी नॅपकिन्सचे महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यांतील गरजू महिलांना वितरण करण्यात येणार आहे.
गेली 193 वर्षे शुद्धता, परंपरा आणि विश्वास या त्रिसूत्रीच्या पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. यांच्या वतीने अनेक सामाजिक, शैक्षणिक व समाजपयोगी उपक्रम राबवले जातात. त्यात या उपक्रमाचीही भर पडली आहे.
मासिक पाळीबद्दलचा संवाद हा पारंपरिक गैरसमजुती, रुढी, पंरपरा यापासून दूर जात स्त्रीत्वापर्यंत येऊन पोहोचला आहे. बराच दीर्घ पल्ला गाठला असला तरी अजूनही खूप काही शिल्लक आहे. सामाजिक समस्या ओळखून चंदूकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. यांनी आतापर्यंत विविध सामाजिक कामांत सहभाग नोंदवला आहे, त्याचप्रमाणे ही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. चे चेअरमन किशोरकुमार शहा यांनी व्यक्त केले आहेत.
चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. यांच्यावतीने “मासिक पाळीच्या वेळी घ्यावयाची काळजी’ याबाबत वैद्यकिय क्षेत्रातील नामवंत वक्त्यांची व्याख्यानेही आयोजित करण्यात येणार असून, ग्रामीण भागातील महिलांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.