जवळार्जुन – करोनाबाधितांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी गुणकारी असणाऱ्या जेजुरी येथील इंदू केअर फार्मा कंपनीच्या वतीने शतगंधा प्लस या आयुर्वेदिक औषधांचे मोफत वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे राज्य सरचिटणीस डॉ. रामदास कुटे यांनी दिली.
रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी महाराष्ट्र राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस आणि जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे
यांनी सुमारे दीड लाख रुपये किमतीची शतगंधा प्लस ही आयुर्वेदिक औषधे बारामती येथील सिल्व्हर ज्यूबली हॉस्पिटलसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरित केली.
यावेळी बारामती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, डॉ. काळे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रमोद काकडे, ऍड. किरण गुजर, इंदू केअर फार्मचे विशाल साळुंखे सुजित राणे उपस्थित होते.