नवी दिल्ली-डॉलर कमकुवत होत असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर काही प्रमाणात वधारले असले तरी भारतीय सराफात मात्र सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाले. भारतीय रुपयाचे मूल्य मंगळवारी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाल्याचे विश्लेषकांना वाटते.
मंगळवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 102 रुपयांनी कमी होऊन 48,025 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 269 रुपयांनी कमी होऊन 70,810 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,882 डॉलर तर चांदीचा दर 27.67 डॉलर प्रती औंस झाला. रुपयाचा भाव वाढल्यानंतर आयातदारांना सोने महागात पडते.
त्यामुळे सोन्याचे दरवाढले असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. आज रूपयाचे मूल्य बरेच वाढल्यामुळे सोन्यांच्या दरावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येते.