जामखेड (प्रतिनिधी) : गत महिनाभरापासून लॉकडाऊन मुळे अनेक कुटुंबांचा रोजगार बुडाला आहे. विशेषतः हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांकडे असणारी जमापुंजी दरम्यानच्या काळात संपुष्टात आली आहे. जामखेड नगरपरिषदचे नगरसेवक अमित चिंतामणी यांनी पुढाकार घेत प्रभाग क्रमांक १३ मधील ३०० कुटुंबांना मोफत किराणा व भाजीपाला घरपोच देऊन आधार दिला आहे
जामखेड शहरात हॉटस्पॉट असल्याने अत्यावश्यक सेवा बंद करण्यात आली आहे त्यामुळे शहराची परिस्थितीत बिकट होत चालली आहे. त्याअनुषंगाने प्रभाक क्रमांक १३ चे नगरसेवक अमित चिंतामणी यांनी पुढाकार घेऊन आपल्या प्रभागातील कोर्ट रोड, सोनार गल्ली, जाधव गल्ली,मोगलपुरा, मेन पेठ, जुनी स्टेट बँक परिसरातील गरजू कुटूंबियांतील 300 जाणाना किरणा व पालेभाज्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पिनु राऊत. नितीन जगताप. सुमित खांडवीकर.दादा कुलथे आदींनी यावेळी मदत केली.