वाई, (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रात नावाजलेली दिशा ॲकॅडमी आता सातारा शहरात देखील आपल्या शैक्षणिक सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. यानिमित्ताने दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम यांचा रविवार, दि. २१ एप्रिल रोजी ‘दहावीनंतरच्या करिअरच्या वाटा’ या विषयावर मोफत सेमिनार हॉटेल राधिका पॅलेस येथे आयोजित केला आहे.
दहावीनंतर करिअरच्या विविध संधी जाणून घेण्यासाठी पालकांची तारांबळ उडत असताना दिशा ॲकॅडमीचे साताऱ्यातील दमदार आगमन पालक व विद्यार्थ्यांना सुखावणारं आहे. यानिमित्त दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम यांचा हा सेमिनार होणार आहे.
दिशाच्या सातारा शाखेची माहिती देताना प्रा. नितीन कदम म्हणाले, आर्थिक अडचणीमुळे शिक्षणाच्या वाटा खुंटू नये, हा दिशा ॲकॅडमीचा व्यापक दृष्टीकोन पालक आणि विद्यार्थ्यांना नेहमीच दिलासा देत आला आहे. शिक्षणाचा उच्च दर्जा राखत आम्ही सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तत्पर आहोत.
२१ एप्रिल रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत होणाऱ्या या मोफत सेमिनारमध्ये दहावीनंतर करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षा, परीक्षा उतीर्ण होण्याचे तंत्र, अशा महत्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. सेमिनारच्या अधिक माहितीसाठी ॲकॅडमीशी संपर्क सादण्याचे आवाहन त्यांनी केले.