Disha Patani । बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहे. अभिनेत्याच्या आगामी ‘योद्धा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहत्यांनाही ट्रेलर खूप आवडला आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राची जबरदस्त ॲक्शन पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सिद्धार्थ सोबत दिशा पटानी आणि राशि खन्ना देखील आहेत.
Launching the trailer in #YODHA STYLE, literally!✈️
Buckle up, we’re soaring to higher heights (37,000ft for this one!) of entertainment!🔥 #YodhaTrailer out now!#Yodha in cinemas March 15.#KaranJohar @apoorvamehta18 #ShashankKhaitan @SidMalhotra #RaashiiKhanna #SagarAmbre… pic.twitter.com/5mbfp1eGWh— Disha Patani (@DishPatani) March 1, 2024
ही सर्व स्टार कास्ट ‘योद्धा’ चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, अभिनेत्री दिशा पटानीने करण जोहरचे कौतुक केले आह. तिने नेपोटिझमवर आपली पभूमिका मांडली आहे.
दिशा म्हणाली, ‘आज जर मी अभिनेत्री आहे तर ते करण जोहरमुळे आहे. कारण मी मॉडेलिंग करत असताना त्यानेच मला प्रत्यक्ष पाहिले होते. मी फक्त 18 वर्षांचा होते. मला असे वाटते की त्यावेळी त्याने मला पाहिले नसते तर मी आज अभिनेत्री बनले नसते.’ त्यामुळे लोक जेव्हा घराणेशाहीवर काहीही बोलतात तेव्हा मी बाहेरची असताना त्याने मला अभिनय क्षेत्रात ब्रेक दिला.’ करणने मला दिलेली ही संधी अभिनेत्री बनण्यास मदत केली.’ असं म्हणत तिने करणचे कौतुक केले आहे. तिच्या या वक्तव्यावर करणने ‘आय लव्ह यू’ म्हणत तिला मिठी मारली.
बॉलीवूड मध्ये घराणेशाही आहे आणि करण फक्त स्टार किड्सला चित्रपटात घेतो असे अनेकदा आरोप करण्यात येतात. मात्र अभिनेत्री दिशा पाटणीने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिशा म्हणाली, चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक हे सर्व ‘बाहेरचे’ आहेत आणि शशांक खेतानला ‘बाहेरील लोकांचा ब्रँड ॲम्बेसेडर’ असं म्हणत तिने करणवर होणाऱ्या आरोपांवर उत्तर दिल आहे. चित्रपटाच्या रिलीजबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट 15 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.