मुंबई – ‘पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोंलन करून जेलमध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपुन बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला.’ असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांची पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात सभा पार पडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. सभेत राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, राज ठाकरे यांनी त्यांचे आंदोलन अर्धवट सोडल्याच्या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच सवाल केला आहे. कोणतं हिंदुत्व बोलताय तुम्ही? उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट सांगाव की तुमच्या अंगावर एका तरी आंदोलनाची केस आहे का? भूमिकाच कुठली घ्यायची नाही. असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल केला यावर आता शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दीपाली सय्यद यांनी ट्विट करत म्हटलं, “पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोंलन करून जेल मध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपुन बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला.” दीपाली सय्यद यांनी केलेल्या या टीकेवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहवं लागेल.
दीपाली सय्यद यांचे ट्विट
पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोंलन करून जेल मध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपुन बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला. @mnsadhikrut @RajThackeray @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) May 22, 2022