जयपूर – केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर काँग्रेसशासित राजस्थान सरकारने शनिवारी पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) प्रति लिटर 2.48 रुपये आणि डिझेलवरील व्हॅट प्रतिलिटर 1.16 रुपयांनी कमी केला. त्यामुळे राज्यात पेट्रोल 10.48 रुपयांनी तर डिझेल 7.16 रुपयांनी स्वस्त होणार आहे.
दरम्यान, केरळ सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरील करात कपात करण्याची घोषणा केली आहे. राजस्थान सरकारच्या या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विटरवरून दिली.
राजस्थान सरकार हे सातत्याने आपल्या राज्यातील नागरीकांच्या हितासाठी संवेदनशीलपणे निर्णय घेत असून आर्थिक अडचणीच्या काळातही जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न या सरकारकडून सातत्याने केला जात असल्याचे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेसने केले आहे.