बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार याच्या आगामी ‘मिशन मंगल’ चित्रपटाचा नुकताच ऑफिशल ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कीर्ती कुल्हारी, नित्या मेनन आणि अभिनेता शरमन जोशी देखील दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टिझर रिलीज देखील करण्यात आला होता. ‘मिशन मंगल’ हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.