कीव – युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की देश सोडून पळून गेल्याची मोठी बातमी समोर आली होती. झेलेन्स्की पोलंडला पळून गेल्याचा दावा रशियन संसदेच्या स्पीकरने केला होता. मात्र हे वृत्त खोटे असून झेलेन्स्की युक्रेनमध्येच असल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
9 दिवसांपासू सुरु आहे युद्ध
गेल्या 9 दिवसांपासून रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. युक्रेनचे सैन्य रशियाशी सतत्याने लढत आहे, परंतु रशियन सैन्याची संख्या खूप जास्त आहे. त्याचवेळी रशिया युक्रेनची राजधानी कीवसह सर्व शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. त्यामुळे युक्रेनला सर्वाधिक फटका बसला आहे. बहुतेक रशियन क्षेपणास्त्र हल्ले लष्कराच्या तळांवर झाले आहेत, ज्यात हजारो युक्रेनियन सैनिक मारले गेले आहेत. त्याचबरोबर युक्रेनकडून असाही दावा करण्यात आला आहे की, गेल्या 9 दिवसांत रशियाचे 9 हजारांहून अधिक सैनिक मारले गेले आहेत.