मुंबई – लंकन ब्युटी म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या किलर अदांनी अनेकांना घायाळ करणाऱ्या जॅकलिनचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. ज्यामध्ये ती कॉस्मेटिक सर्जरीबाबत भाष्य करते.
जॅकलिन श्रीलंकेची मिस युनिव्हर्स आहे. या स्पर्धेदरम्यान जॅकलिनला कॉस्मेटिक सर्जेरीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. जॅकलिनने दिलेले उत्तर नेटकऱ्यांना आता खोट वाटत असल्यामुळे जॅकलिन चांगलीच ट्रॉल होतीय.
“कॉस्मेटिक सर्जरी हा अयोग्य प्रकारे उचललेला फायदा आहे म्हणून मला ते ब्युटी स्पर्धेच्या विरोधात वाटते. महिलांच्या नॅचरल सौंदर्याचे आपण कौतुक केले पाहिजे. काहींना त्याचा खर्च परवडतो तर काहींना परवडत नाही परंतु ब्युटी स्पर्धा म्हणजे कस्मेटिक सर्जरी नक्कीच नाही” असं जॅकलिन या व्हिडिओमध्ये बोलते.
जॅकलिनचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिचे जुने आणि आत्ताचे फोटो पोस्ट केले आहेत. एकाने कमेंट करत तू इतकी कशी काय बदललीस सर्जरी केली का ? असं सवाल विचारला आहे. तर दुसऱ्याने काय होतीस तू… काय झालीस तू ? अशी कमेंट केली आहे. जॅकलिन नुकतीच अक्षय कुमारच्या राम सेतू चित्रपटात दिसली होती. तसेच लवकरच ती रणवीर सिंगसोबत सर्कस या चित्रपटात देखील दिसणार आहे.