पुणे -ग्रामीण भागातील दस्त नोंदणीची दुय्यम निबंधक कार्यालये सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार सोमवारपासून (दि. 18) ग्रामीण भागातील 21 दुय्यम निबंधक कार्यालये सुरू होणार आहेत. त्यामुळे सदनिका, दुकाने, जमीन आदींची खरेदी-विक्रीचे व्यवहार नागरिकांना नोंदविता येणार आहे. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे.
यामध्ये बारामती- सह दुय्यम निबंधक वर्ग-2, क्रमांक-1, क्रमांक-2, दुय्यम निबंधक कार्यालय शिरुर व तळेगाव ढमढेरे, दुय्यम निबंधक कार्यालय दौंड व केडगाव, दुय्यम निबंधक कार्यालय भोर, दुय्यम निबंधक कार्यालय वेल्हा, दुय्यम निबंधक कार्यालय इंदापूर, दुय्यम निबंधक कार्यालय जुन्नर व नारायणगाव, दुय्यम निबंधक कार्यालय आंबेगाव, दुय्यम निबंधक कार्यालय पुरंदर, दुय्यम निबंधक कार्यालय मुळशी 1 (पौड) व मुळशी 2 (हिंजवडी), दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे व लोणावळा, दुय्यम निबंधक कार्यालय, खेड 1, खेड 2 (चाकण), खेड 3 ही कार्यालये सुरू होणार आहेत.