दिया मिर्झा घेतेय पेग्नन्सीचा आनंद

बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा सध्या तिच्या गर्भावस्थेचा आनंद घेत आहे. काही दिवसांपूर्वीच दियाने बेबी बंपसह फोटो शेअर करून चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. कोविडसारख्या कठीण काळात जिथे प्रत्येकजण घरीच राहून स्वत:ची काळजी घेत आहे, अशा वेळी दियादेखील स्वतःला फिट ठेवण्यासाठी घरीच वर्कआऊट करत आहे.

दियाने तिचा वर्कआऊट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या घराच्या छतावर काही व्यायाम करताना दिसत आहे. पांढऱ्या टी-शर्ट आणि लोअरमध्ये दिया ट्रेनरच्या मदतीने वर्कआऊट करत आहे. यादरम्यान, दियाचा बेबी बंपदेखील दिसतो आहे.

दियाने एका खास फोटो पोस्टसोबत आपण गर्भवती असल्याची घोषणा केली होती. तिने आपला बेबी बंप फोटो शेअर करत लिहिले की, ‘आनंद होतोय जीवनाच्या शक्‍तींसह, ती सुरुवात ही सर्वकाही असते. माझ्या गर्भाशयात असणाऱ्या या चिमुकल्या जीवाची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळाली याचा मला फार आनंद होत आहे.

दरम्यान, दियाने ही घोषणा केली तेव्हा तिला बऱ्याच लोकांनी ट्रोल केले होते. वास्तविक, दिया आणि वैभवचे फेब्रुवारी महिन्यातच लग्न झाले होते. अर्थात दिया लग्नाआधीच गर्भवती असल्याने तिला ट्रोल केले गेले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.