पिंपरी – भोसरी येथील वेदिका शिंदे या आठ महिन्याच्या मुलीला झालेल्या एसएमए टाईप 1 या दुर्धर आजारावरील उपचारासाठी आत्तापर्यंत पावणेचार कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. तिला बरे करण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या “झोलजेन्स्मा’ या इंजेक्शनसाठी 15 ते 18 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
भोसरी येथील रहिवाशी सौरभ आणि स्नेहा शिंदे यांची वेदिका ही कन्या आहे. वयाच्या आठव्या महिन्यातच तिला स्पायनल मस्क्युलर ऍट्रॉफी टाइप (एसएमए टाईप 1) हा आजार निष्पन्न झाला आहे. तिच्यावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिला बरे करण्यासाठी “झोलजेन्स्मा’ हे इंजेक्शन अमेरिकेतून मागवावे लागणार आहे.
त्याची किंमत 15 ते 18 कोटी दरम्यान आहे. वेदिका बरी व्हावी, यासाठी तिच्या वडीलांनी दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, कंपन्या यांना मिलाप क्राऊड फंडींग संकेतस्थळामार्फत आवाहन केले होते. त्यानुसार आतापर्यंत 3 कोटी 75 लाख 42 हजार 132 रुपयांचा निधी जमा झाला आहे.