नवी दिल्ली – बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र स्क्रीनपासून दूर गेले आहेत आणि ते आपला वेळ फार्महाऊसमध्ये घालवतात. धर्मेंद्र सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहेत फार्महाऊसवरून वेगवेगळे व्हिडीओ ते आपल्या चाहत्यांसाठी शेअर करतात.
असा एक व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून, सध्या त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये 87 वर्षीय धर्मेंद्र हे आज देखील पूर्वी सारखेच फिट आणि सक्रिय असल्याचं दिसत आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर आपला हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Friends, Today on this international yoga day … josh aa gaya….I have started my water aerobics in the evening too 🙏 it is a fun to do your aerobics against the current of water 🙏 Hope you will like it 👍 pic.twitter.com/zyLJULQc8O
— Dharmendra Deol (@aapkadharam) June 21, 2021
व्हिडीओत पाण्यामध्ये ते एरोबिक्स करताना दिसत आहेत. धर्मेंद्र यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्तानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओला पाणी एक कॅप्शन सुद्धा दिलं आहे. ते म्हणतात की, ”मित्रांनो… आज आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्तानं माझ्यात एनर्जी आली आहे.. मी आज संध्याकाळपासून वॉटर एरोबिक्स सुरू केलं आहे. पाण्यामध्ये एरोबिक्स करण्यात एक वेगळाच आनंद आहे.
आशा करतो की तुम्हाला हा व्हिडीओ नक्की आवडेल” असं ते व्हिडिओ शेअर करत म्हणाले आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यांच्या चाहत्यांनी यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव सुद्धा केल्याचं दिसत आहेत. धर्मेंद्र यांचा हा व्हिडीओ पाहून त्यांच्या हिमतीला दाद देताना दिसत आहेत. स्विमिंग पूल मधील धर्मेंद्र यांचा एरोबिक्स अवतार सगळ्यांनाच आवडला आहे.