नवीदिल्ली – क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा टी-20 वर्ल्ड कप पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली. मात्र, धनश्रीने तिचा फोटो शेअर करताना लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिचे कॅप्शन वाचणारे युजर्स असा कयास लावत आहेत की धनश्री अप्रत्यक्षपणे अभिनेत्री उर्वशी रौतेलाला टोला लगावला आहे.
View this post on Instagram
धनश्री आणि युझवेंद्र त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांनंतरही काही आठवडे सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत आहेत. त्यांनी नुकताच करवा चौथ साजरा केला आणि युझवेंद्रला व्हिडिओ कॉलद्वारे पाहिल्यानंतर आपला उपवास पूर्ण केला. धनश्री नुकतीच नेहा कक्करच्या ‘ओ सजना’ या गाण्यात दिसली. फाल्गुनी पाठकच्या ‘मैंने पायल है छनकाई’ या हिट गाण्याचा हा रिमेक होता.