मुंबई – भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती. त्यासोबतचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा देखील आज वाढदिवस .राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर जात अभिवादन केले. तसेच शरद पवार यांना देखील धनंजय मुंडे यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
“हॅलो, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय…’ अप्पा या तुमच्या वाक्याचं वजन मीच काय अनेकांनी अनुभवलंय, तुमचा वाढदिवस म्हणजे उत्सव असायचा आमचा ! आता जयंती म्हणावं लागतं याचं दुःख आहे, पण तुम्ही आमच्यात आहेत, तुम्ही दिलेल्या शिकवणीतून विनम्र अभिवादन अप्पा…” अशा आशयाचे ट्विट धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन व्यक्त करण्यासाठी केले आहे.
‘हॅलो, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय…’ अप्पा या तुमच्या वाक्याचं वजन मीच काय अनेकांनी अनुभवलंय, तुमचा वाढदिवस म्हणजे उत्सव असायचा आमचा! आता जयंती म्हणावं लागतं याचं दुःख आहे, पण तुम्ही आमच्यात आहेत, तुम्ही दिलेल्या शिकवणीतून!विनम्र अभिवादन अप्पा… #RememberingGopinathraoMundeSaheb pic.twitter.com/WFCSvGQNot
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 12, 2022
पवारांनाही दिल्या शुभेच्छा
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीसह आज शरद पवार यांचा देखील वाढदिवस असल्यामुळे धनंजय मुंडे यांनी त्यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत. “देशाच्या राजकारणातील महाराष्ट्राचा अभेद्य सह्याद्री, पद्मविभूषण आदरणीय खा. पवार साहेब आपणास जन्मदिनाच्या निमित्ताने हृदयपूर्वक शुभेच्छा. आपण आमची ऊर्जा व उमेद आहात, आपणास दीर्घायुष्य लाभो, ही प्रभू वैद्यनाथास प्रार्थना” अशा आशयाचे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.
देशाच्या राजकारणातील महाराष्ट्राचा अभेद्य सह्याद्री, पद्मविभूषण आदरणीय खा. @PawarSpeaks साहेब आपणास जन्मदिनाच्या निमित्ताने हृदयपूर्वक शुभेच्छा. आपण आमची ऊर्जा व उमेद आहात, आपणास दीर्घायुष्य लाभो, ही प्रभू वैद्यनाथास प्रार्थना. pic.twitter.com/Z6Mdzqmckg
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 12, 2022