पुणे : भाजप शहर प्रवक्ते धनंजय विष्णू जाधव यांची डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. जाधव यांना नियुक्तीपत्र डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य सचिव जयेश काळे यांनी काढले आहे. डान्स स्केट स्पोर्ट फेडरेशन ऑफ (इंडिया) चे टेक्निकल हेड मार्क भस्मे यांनी नियुक्ती पत्र जाधव यांना दिले.
डान्स स्केट या खेळाचा स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया (एस जी एफ आय ) च्या खेळांच्या यादीत समावेश झाला असून देशातील सर्व सीबीएससी बोर्डाच्या च्या 19 वर्षा पर्यत च्या शाळा आणि कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा या खेळात समावेश असेल.पुढील महिन्या पर्यंत (एस एस सी ) बोर्डाच्या सर्व मराठी शाळा कॉलेज मधील 19 वर्षा पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या खेळाचा समावेश होईल. पुढील महिन्यात धनंजय जाधव यांच्या अध्यक्ष ते खाली असोसिएशन च्या वतीने पुणे शहरात जिल्हास्तरीय, सीबीएससी बोर्ड इंटर स्कुल, तसेच सर्वासाठी खुली डान्स स्केट स्पर्धा होणार आहेत.