Devendra Fadanvis in Gangapur – योजनेच्या माध्यमातून लोकांना मदत दिली जावी म्हणून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. असाच कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर शहरात गंगापूर मतदार संघाचे आमदार प्रशांत बंब यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. परंतु, या कार्यक्रमात एक अजबच प्रकार घडला आहे.
एकीकडे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते. तर दुसरीकडे स्टेजच्या समोरच्या बाजूला लोकांनी तोबा गर्दी करत वाटप करण्यासाठी आणलेल्या लोखंडी पेट्या व आरोग्य कीट व अन्य साहित्यच पळवले.
लाभार्थ्यांऐवजी गर्दी केलेल्या लोकांनीच या पेट्या पळवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
फडणवीसांचे भाषण सुरु, दुसरीकडे लोकांनी पेट्या पळवल्या
छ. संभाजीनगरमधील कार्यक्रमातील प्रकार
आ. प्रशांत बंब यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील प्रकार
पेट्या पळवण्यासाठी लोकांची झुंबड#sambhajinagar #DevendraFadanvis #fadanvis pic.twitter.com/3rfD5wibeQ
— Prathmesh Telang (@Prathmesh9579) January 11, 2024
अन् कार्यक्रमाचे नियोजन कोलमडले | Devendra Fadanvis in Gangapur
गंगापूर उपसा जलसिंचन योजनेच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आमदार प्रशांत बंब यांच्याकडून किट वाटप करण्यात येणार होते. यावेळी मोठा गोंधळ उडाला. यावेळी पेट्या पळवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. पेट्या पळविण्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
या प्रकारामुळे कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन कोलमडले. या गोंधळात बाहेरचेच अनेकजण पेट्या पळवून नेण्यात यशस्वी ठरले अन् लाभार्थी मात्र वंचित राहिले.
Shivsena UBT | अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरेंच्या मागे नवे ‘विघ्न’
Kiran Mane : ‘सत्ता हिसकावणं सोपं असतं, पण…’; निकालांनतर किरण मानेंचा शिंदे गटाला टोला