मुंबई : बॉलिवूडमध्ये अभिनेत्री दिशा पाटनी आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचे दिसते. नुकत्याच झालेल्या “मलंग’ चित्रपटामुळे दिशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता दिशा पाटनी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या पावलावर पाऊल टाकण्याची इच्छा आहे. तिला प्रियंका चोप्राकडून खूप प्रेरणा मिळाली असून, त्यांच्यासारखे व्हावेसे वाटते, असे दिशा पाटणी म्हणाली.
नुकत्याच एका मुलाखतीत दिशा पाटनी म्हणाली, बॉलिवूडची ‘देशी गर्ल’ अर्थात प्रियांका चोप्राला मी खुपच फॉलो करते. प्रियांका माझयासाठी प्रेरणास्थान आहे. छोट्या गावातून येवून बॉलीवूडच नव्हे तर आज हॉलीवूडमध्येही छाप पाडणे तितकेसे सोपे नाही. प्रियांकाने जे केले त्यामुळे अभिनय क्षेत्रात भारताने नाव जगभरात घेतले जात आहे.
दरम्यान, वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास दिशा पाटनी सध्या “मलंग’ चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आदित्य रॉप कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. यानंतर ती सलमान खानच्या आगामी “राधे’ चित्रपटाच्या सिक्वलमध्ये काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करणार आहे.