अधिवेशनानंतर अवघ्या 24 तासांत भाजपला खिंडार

4 नगरसेवकांचा राजीनामा 

गणेश नाईक यांच्या गटाला मोठा धक्का

नवी मुंबई – नवी मुंबईतून भाजपला मोठे खिंडार पडले आहे. भाजपच्या 4 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना भाजप नेते गणेश नाईक यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. हे सर्व नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.

तुर्भेतील नगरसेवक सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वास्के, मुद्रिका गवळी यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका आयुक्त आणि सचिवांना राजीनामे सोपवले. नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्याने गणेश नाईकांना जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेले गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेतल्या सर्व नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले.

या अधिवेशनाच्या निमित्ताने भाजप विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी सूत्रे हाती घेतली. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. अगदी या अधिवेशनाच्या 24 तासांच्या आत भाजपच्या नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.