रेडा-इंदापूर येथील ग्रीन वूड क्रिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लघुपट महोत्सवात कोल्हापूर येथील देशी व केरळ मधील कनलवाझीये या लघुपटांनी प्रथम पारितोषिक पटकावले. या महोत्सवात विविध राज्यातून 161 लघुपटांनी सहभाग घेतला होता.
इंदापूर येथे तीन दिवसीय राष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी (दि. 3) या महोत्सवाचे बक्षीस वितरण करण्यात आले.
यामध्ये सर्वोकृष्ट दिग्दर्शक शहिर शा (रिकगनेशन), सर्वोकृष्ट पटकथा आशुतोस जरे (कावळा उड), सर्वोत्कृष्ट छायचित्रण गिरीष जांभळीकर (फ्रेशनर), सर्वोकृष्ट कथा रामेश्वर झिंजुर्डे (सलाईन), सर्वोकृष्ट अभिनेता संजय ठाकूर (दोन जगातला कवी), सर्वोकृष्ट संकलन शांतारूबन गनशेकरण (ग्रे), सर्वोकृष्ट कला दिग्दर्शक सुनील कदम व नागेश नाईक (राजा), सर्वोकृष्ट अभिनेत्री केतकी नारायण (नो गो), सर्वोकृष्ट बालकलाकार आर्यन पाटील (चित्रकार) आणि प्रांजल सुरडकर (सुंद्री), सर्वोकृष्ट ज्युरी ऍवार्ड मिस युज व सुंद्री यांना देण्यात आले.
या लघुपट महोत्सवाचा आरंभ 1 मार्च रोजी प्रमुख पाहुणे प्रशांत शिताप, योगेश गुंडेकर, राहुल गुंडेकर, सागर सुर्यवंशी, दशरथ भोंग, गटनेते कैलास कदम, प्रशांत उंबरे यांच्या हस्ते करण्यात आला. बक्षीस वितरण समारंभास व्यवस्थापक अनिल कडाळे व तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील मुख्य कलाकार हार्दिक जोशी यांचे वडिल महेश जोशी उपस्थित होते. तसेच फेस्टीव्हलचे दिग्दर्शक सोमनाथ जगताप उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिनू जगताप, सौरभ वाघमारे, दादा महाजन, केदार वाघमारे, दत्ता पांडे, प्रशांत गाडेकर यांनी प्रयत्न केले.