झाग्रेब – डेव्हिस चषक पात्रता फेरी स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताला क्रोएशियाकडून 2-0 असा पराभव पत्करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात प्रज्ञेश गुणेश्वरनला बोर्ना गोजो यांच्याकडून तर रामकुमार रामनाथन याला जागतिक क्रमवारीत ३७व्या स्थानी असलेला आणि २०१४ साली अमेरिकन ग्रँडस्लॅम जिंकणारा मारिन चिलिच यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला आहे.
पहिल्या सामन्यात क्रोएशियाच्या बोर्ना गोजो याने प्रज्ञेश गुणेश्वरनला 3-6, 6-4, 6-2 असे पराभूत केले. हा सामना 57 मिनिटे चालला. तर, दुसऱ्या सामन्यात रामकुमार रामनाथन याचा मारिन चिलिच याने 7-6 (8) ,7-6(8) असा पराभव करत विजय नोंदविला. ही लढत 2 तास 12 मिनिटे चालली.
Advantage Croatia! ??
After losing the first set, Borna Gojo battles back to defeat Prajnesh Gunneswaran 3-6 6-4 6-2 and give Croatia the lead against India…#DavisCupQualifiers #CROIND pic.twitter.com/SCV6hqVWH4
— Davis Cup (@DavisCup) March 6, 2020
त्यानंतर आता भारतीय संघाला डेव्हिस चषक पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी शनिवारी उर्वरित तिन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे.