पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहांनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली : देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा आज 92 वा वाढदिवस आहे. भाजपचे लोहपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिग्गज नेत्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्याबरोबर भाजप अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा हेही उपस्थित होते.
Delhi: PM Narendra Modi meets senior BJP leader LK Advani at the latter’s residence on his 92nd birthday. Vice President Venkaiah Naidu, BJP President Amit Shah and BJP working President JP Nadda also present. pic.twitter.com/jBO6r3S4Xw
— ANI (@ANI) November 8, 2019
तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन आडवाणी हे बुद्धिमान, दिग्गज राजकारणी आणि देशातील सर्वांत सन्मानित नेत्यांपैकी एक असल्याचे म्हटले. एकापाठोपाठ एक ट्विट करुन त्यांनी अडवाणींचे कौतुक केले. ते म्हणाले, नागरिकांना सशक्त करण्यासाठी लालकृष्ण आडवाणी यांचे योगदान भारत सदैव स्मरणात ठेवेल. जन्मदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या दीर्घायुष्याबाबत प्रार्थना करतो.
#WATCH: PM Narendra Modi meets senior BJP leader LK Advani at the latter’s residence on his 92nd birthday. Vice President Venkaiah Naidu, BJP President Amit Shah and BJP working President JP Nadda also present. #Delhi pic.twitter.com/zUvVVQJMvg
— ANI (@ANI) November 8, 2019
आडवाणींच्या योगदानाबाबत ते म्हणाले की, त्यांनी अनेक दशकांपर्यंत भाजपचा विस्तार आणि आकार देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. गेल्या काही वर्षांत आमचा पक्ष देशात महत्त्वाच्या भूमिकेत आला आहे. यामागे आडवाणींसारखे नेते आणि त्यांनी तयार केलेल्या लाखो निःस्वार्थ कार्यकर्त्यांचे योगदान आहे.
For Advani Ji, public service has always been associated with values. Not once has he compromised on the core ideology. When it came to safeguarding our democracy, he was at the forefront. As a Minister, his administrative skills are universally lauded.
— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2019
Shri LK Advani Ji toiled for decades to give shape and strength to the @BJP4India. If over the years, our party has emerged as a dominant pole of Indian politics, it is because of leaders like Advani Ji and the selfless Karyakartas he groomed for decades.
— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2019
<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”en” dir=”ltr”>Scholar, statesman and one of the most respected leaders, India will always cherish the exceptional contribution of Shri Lal Krishna Advani Ji towards empowering our citizens. On his birthday, I convey my greetings to respected Advani Ji and pray for his long and healthy life.</p>— Narendra Modi (@narendramodi) <a href=”https://twitter.com/narendramodi/status/1192630483575693313?ref_src=twsrc%5Etfw”>November 8, 2019</a></blockquote> <script async src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>
त्यांनी जनसेवा करताना नेहमी मूल्यांकडे लक्ष दिले. आपल्या मूळ विचारधारेशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. लोकशाहीच्या संरक्षणाबाबत जेव्हा बोलले जाते, तेव्हा ते पहिल्या रांगेत येतात. एक मंत्री, एक प्रशासक म्हणून त्यांच्या योगदानाचा प्रत्येक ठिकाणी गौरव झाला आहे.