‘बंगळुरू रोज’ कांद्यावरील निर्यातबंदी हटविण्याची मागणी

नवी दिल्ली – केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात अचानक सर्व कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे अनेक प्रश्र निर्माण झाले आहेत. कर्नाटकमध्ये “बंगळुरू रोज” नावाचा कांदा घेतला जातो. हा कांदा भारतातील ग्राहक वापरत नाहीत.

तो निव्वळ निर्यात करण्यासाठी तयार केला जातो. फक्त द.-पूर्व आशियातील देश हा कांदा वापरतात. मात्र, सरसकट बंदीमध्ये बंगळुरू रोजचा समावेश करण्यात आला आहे. भारतातील लोक हा कांदा वापरतच नसल्यामुळे या कांद्याला भारतातील बाजारपेठ उपलब्ध नाही. यासाठी या कांद्याची निर्यात करणे गरजेचे आहे. अन्यथा हा दहा हजार टन कांदा वाया जाणार असल्याचे उत्पादकांनी केंद्र सरकारला सांगितले आहे. या घटनाक्रमाची माहिती कर्नाटकमधील केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांना आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.