Delhi Excise Policy Case। आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना शनिवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टातून मोठा झटका बसला. न्यायालयाने दोन्ही नेत्यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ केलीय. अबकारी धोरण प्रकरणात घोटाळा प्रकरणात दोन्ही नेते तुरुंगात आहेत. या अगोदर आप नेते संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांना अबकारी धोरण प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले.
मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना झटका Delhi Excise Policy Case।
सीबीआयने सिसोदिया यांना गेल्या वर्षी २६ फेब्रुवारी रोजी दिल्ली अबकारी धोरण २०२१-२२ च्या निर्मिती आणि अंमलबजावणीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटक केली होती. सिसोदिया तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असताना 9 मार्च रोजी ईडीने त्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली.
या प्रकरणात अटक Delhi Excise Policy Case।
या प्रकरणी आपचे आणखी एक नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांना ईडीने ४ ऑक्टोबरला अटक केली होती. दिल्लीच्या अबकारी धोरणात मद्यविक्रेत्यांकडून लाच घेण्याच्या कटाचा संजय सिंग हा एक भाग होता, असे ईडीने न्यायालयाला सांगितले होते.
दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने 17 नोव्हेंबर 2021 रोजी नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू करून सरकारचा महसूल वाढवण्याचा दावा केला होता. तथापि, जुलै 2022 मध्ये दिल्लीच्या तत्कालीन मुख्य सचिवांनी लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांना अबकारी धोरणातील अनियमिततेबाबत अहवाल सादर केला होता. यामध्ये धोरणातील अनियमिततेसोबतच तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर दारू व्यावसायिकांना अवाजवी लाभ दिल्याचा आरोप करण्यात आला होता.