वैद्यकीय : डेंग्यूची “पीएचसी’तर्फे जनजागृती मोहीम
देहुरोड (वार्ताहर) – बदलत्या हवामानामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय विभागावर ताण येत आहे. तीर्थक्षेत्र देहू डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आल्याने लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे (पीएचसी) वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने डेंग्यू रुग्ण संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.
अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले आहेत. शेतातील पिके ही उद्ध्वस्त झाली आहे, तर साचलेल्या पाण्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. वारंवार बदलत्या हवामानामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये डेंग्यू सदृश्य रुग्णेही आढळून आले आहेत. खासगी दवाखाने, रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती मिळत नाही. मात्र देहू परिसरात डेंग्यू सुदर्शन रुग्ण आढळून आले आहेत. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि “पीएचसी’चे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये ग्रामपंचायतीला औषध फवारणीचे सूचना करण्यात आल्या. नागरिकांना जनजागृती करण्यासाठी ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे. डेंग्यूचे डास गोड्या पानावर पाण्यावर आढळून येतात. डेंग्यूची एक मादी एकावेळी दीडशे ते दोनशे अंडी घालत असते. डेंग्यूचा डास हा साधारणता एक ते दीड फूट उंच उडतो. हा दिवसा चावतो. त्याचा प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी नागरिकांनी एक दिवस कोरडा दिवस पाळावा.
साचलेल्या पाण्याच्या ठिकाणचे पाणी निचरा करण्याचा प्रयत्न करावा. उघड्यावर पडलेल्या नारळाच्या कवट्या, टायर, बाटल्यामध्ये पाणी साचले असल्यास तसेच बांधकामाच्या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाक्यामध्ये डेंग्यू डासांचा प्रादुर्भाव वाढत असतो. साचलेल्या पाण्याचे ठिकाण तसेच तळ्यांच्या ठिकाणी गप्पी मासे सोडावेत. हे मासे डासांची अंडी खातात. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव आळा बसतो. दुर्गंधीयुक्त पाणी किंवा साचलेले गढूळ पाण्याच्या ठिकाणची माहिती स्थानिक प्रशासन व “पीएससी’ला दिल्यास केमी फोर्सचे केमिकल औषध फवारणी करण्यात येईल. ग्रामपंचायतीला ही औषध फवारणी करण्यासाठी सूचना करण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी किशोर यादव यांनी सांगितले.
नागरिकहो काळजी घ्या…
ताप येणं, सांधे दुखणे, स्नायू दुखणे, पाठ दुखणे, डोकेदुखी, मळमळ, थकवा येणे, अंगावर पुरळ येणे ही लक्षणे दिसून येतात. अनेकांमध्ये सांधे दुखणे हे प्रमुख लक्षण दिसून येते. हे काही आठवडे ते काही वर्षांपर्यंत चालू शकते. दुखणे इतके जास्त असते की, साधी हालचालदेखील करता येत नाही. काहींमध्ये ही लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात आणि ते पूर्णपणे बरे होतात. सांधेदुखी प्रामुख्याने वृद्धांमध्ये अनेक वर्षं राहू शकते आणि ते अतिशय हतबल झालेले दिसतात. डासांमुळे डेंग्यू, चिकुन गुनिया, येलो फीवर, झिका, मलेरिया, वेस्ट नाइल फिव्हर, जापनीज एन्सेफलाइटस्, हत्तीपाय आदी घातक आजार होतात. डासांमध्ये वेगवेगळ्या प्रजाती आहेत, ते वेगवेगळे रोग पसरवतात. डासांमध्ये वेगवेगळ्या प्रजाती आहेत ते वेगवेगळे रोग पसरवतात.