रणवीर सिंहने एकदा पत्नी दीपिकाच्या एका फोटोवर मजेदार कॉमेंट केली होती. त्यामुळे दीपिकाने रणवीरला जबरदस्त ट्रोल केले. दीपिकाने सोमवारी रात्री आपल्या शाळेतील प्रगतीपुस्तकाचे काही फोटो शेअर केले. त्या प्रगतीपुस्तकामध्ये तिच्याबद्दल खूप गमतीशीर काही गोष्टी लिहील्या होत्या.
एका ठिकाणी शाळेतील टीचरने लिहीले होते, “सूचनांचे पालन करायला शिकवले जायला पाहिजे.’यावर दीपिकाने नुसतेच “हम्म्ममम्म’ अशी कॉमेंट केली होती. मात्र रणवीरने मात्र टीचरच्या मताशी सहमती दर्शवली आणि “जी हां टीचर, मै आपसे सहमत हूं’असे लिहीले होते. त्यावर दीपिकाने आपल्या नवऱ्याला ट्रोल करताना “तुला आज रात्रीचे जेवण मिळणार नाही.’ असा सज्जड दम भरला.
इन्स्टाग्रामवरच्या दीपिकाच्या या मजेशीर कॉमेंटल तब्बल 28 हजार पब्लिकनी “लाईक’ केले आहे. दीपिकाच्या ट्रोलिंगवर रणवीरची रिऍक्शन काय आहे, हे समजू शकलेले नाही. बॉलिवुडबाबत बोलायचे तर दीपिका ‘छपाक’ मध्ये दिसणार आहे. यामध्ये ती एक ऍसिड अटॅक झालेल्या मूलीची भूमिका करणार आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सी देखील आहे. हा सिनेमा 10 जानेवारीला रिलीज होणार आहे.