मेन्टल हेल्थबाबत जनजागृती केल्याबद्दल दीपिकाला क्रिस्टल ऍवॉर्ड

मानसिक आरोग्याच्या महत्वाबाबत जनजागृती केल्याबद्दल दीपिका पदुकोणला अलिकडेच क्रिस्टल ऍवॉर्डने गौरवण्यात आले आहे. जगभरात तब्बल 300 दशलक्ष लोक मानसिक आजारांनी आणि नैराश्‍याने ग्रासलेले आहेत. हेच त्यांच्या शारीरिक आजारपणाचेही मूळ कारण आहे.

या अदृश्‍य आजाराबाबत आपण स्वतः जाणून घेणे गरजेचे आहे, तसेच या आजाराला दूर ठेवण्यासाठी सामाजिक दबाव आणि किरकोळ वाटणाऱ्या त्रासाकदे दुर्लक्ष न करणे गरजेचे आहे. असे हा पुरस्कार स्वीकारताना तिने सांगितले.

दीपिकाने स्वतःच्या अनुभवातून सावरल्यानंतर 2015 मध्ये “द लीव्ह लव्ह लाफ फौंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून ती जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन देशभर करत असते. याशिवाय ट्रेनिंग सेशन, संशोधन आणि लेक्‍चर सिरीजचेही ती आयोजन करत असते. याद्वारे अनेक मान्यवर आणि मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करत असतात.

आता दीपिकाच्या “छपाक’ प्रमोशन सुरू झाले आहे. ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावरील या सिनेमाची सहनिर्मातीही दीपिका स्वतःच आहे. पुढच्या वर्षी 10 जानेवारीला “छपाक’ रिलीज होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.