एनआरसी म्हणजे नागरिकत्वाची नोटबंदीच….

जेडीयुचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांची सरकारवर टीका

नवी दिल्ली : बिहारमधील सत्ताधारी पक्ष जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर हे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी म्हणजे एनआरसी बाबतच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. देशभरात एनआरसी लागू करण्याच्या विरोधात असल्याचे किशोर यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी सकाळी केलेल्या एका ट्विटद्वारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, एनआरसी म्हणजे नागरिकत्वाची नोटबंदी असल्याचे म्हटले आहे.

“देशभरात एनआरसी लागू करण्याचा विचार म्हणजे नागरिकत्वाची नोटबंदी करण्यासारखे आहे….जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाहीत तोपर्यंत तुम्ही अमान्य आहात…. याचा सर्वाधिक फटका गरीब आणि उपेक्षितांना बसेल हे आम्ही आमच्या अनुभवातून जाणतो,” असे ट्विट किशोर यांनी केले आहे.

शनिवारी प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. यावेळी किशोर यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला होता पण कुमार यांनी राजीनामा स्वीकारण्यास नकार दिल्याची सुत्रांची माहिती आहे. जवळपास दीड तासांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना किशोर म्हणाले होते की, मुख्यमंत्री नितीश कुमार अद्यापही एनआरसीला विरोध करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.