कोलकाता – तृणमूल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोळसा चोरी प्रकरणी सुमारे चार तास चौकशी केली, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
ईडीच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, कोलकाता येथील ईडी कार्यालयात रुजिरा बॅनर्जी या दुपारी साडेबारा वाजता चौकशीसाठी हजर झाल्या. यानंतर त्या दुपारी 4.20च्या सुमारास ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या. या चौकशीत त्यांना परदेशी बॅंकांमधील काही खात्यांबाबत प्रश्न विचारण्यात आले. तसेच त्यांचा जबाब नोंदवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रुजिरा यांना सोमवारी कोलकाता विमानतळावर अमेरिकेला जाण्यापासून रोखण्यात आले होते. यानंतर 8 जून रोजी त्यांना चौकशीस हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. यापूर्वीही त्यांची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.