समर्पित सेवा देणारी इमॅन्युएल मार थोमा शाळा

इमॅन्युएल मार थोमा शाळा ही एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, जी दिघी येरवडा मारथोमा सेंटर द्वारा संचालित केली जाते. इमॅन्युएल मार थोमा शाळा गुणवत्तापुर्ण शिक्षणाचे उत्कर्ष, गतिशील आणि प्रेरणादायक केंद्र आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या महान राष्ट्रातील एक जबाबदार आणि उपयुक्‍त नागरिक म्हणून विकसित करण्यास सक्षम करणे हेच शाळेचे मिशन आहे. शाळेने समाजासाठी शैक्षणिक सेवा देत पंचवीस वर्षे पूर्ण केली आहे.

1994 मध्ये धानोरी येथील विश्रांतवाडीजवळ शाळा सुरू झाली तेव्हा हा परिसर विकसित नव्हता. लोकसंख्या अत्यल्प होती. दर्जेदार शिक्षण देणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा भागात उपलब्ध नव्हत्या. तर दिघी येरवडा मार थोमा सेंटर ला विश्रांतवाडीतील याच जागेवर लवकरात लवकर शाळा बांधण्याची गरज भासली. मुलांना परवडणाऱ्या खर्चामध्ये शैक्षणिक गरजा भागविणे आवश्‍यक होते सुरवातीला विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या सुद्धा खूप कमी होती. शिक्षकांकडून मिळणारे समर्पित ज्ञान आणि शाळेच्या माध्यामातून पुरविल्या जाणाऱ्या सोयी सुविधा यामुळे थोड्याच कालावाधीमध्ये शाळेला परिसरात एक वेगळी ओळख मिळाली.

व्यवस्थापनाच्यावतीने शाळेच्या गरजेवर बारकाईने नजर ठेवली जाते व पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी भर दिला जातो. शाळेच्या आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे ज्यामुळे युवा मनाला प्रेरणा मिळेल. शाळेमध्ये एक कुशल आणि अनुभवी शिक्षकांचा संघ आहे. शाळेत इयत्ता पहिली ते दहावी पर्यतचे 1325 विद्यार्थी आणि 60 अध्यापन व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. शाळेमध्ये स्मार्ट क्‍लास रूम, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक सुविधा , विस्तृत पुस्तके असलेली ग्रंथालय या सारख्या सुविधा आहेत. आमचे विद्यार्थी नृत्यवर्ग, कराटेवर्ग सारख्या शैक्षणिक, क्रीडा आणि इतर सहअभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी करतात. साधारणतः सरासरी 90% टक्के विद्यार्थी एस. एस. सी परीक्षेत विशेष श्रेणी व प्रथम श्रेणी प्राप्त करतात. शाळेमार्फत गरजू विदयार्थ्यांना फी सवलत देण्यात आली आहे.

शाळेची स्थापना मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी केली गेली आहे. विद्यार्थ्याना सर्व आधुनिक सुविधा शाळा प्रदान करते. शिक्षकांची समर्पित भावना प्रत्येक विद्यार्थ्याच्या विकासासाठी काम करते त्यामुळे ही शाळा परिसरात शिक्षणाचे एक प्रसिद्ध केंद्र बनले आहे.
– संध्या सुरेश, मुख्याध्यापिका, इमॅन्युएल मार थोमा शाळा

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)