कोट्यवधीच्या कल्याणकारी योजना असूनही प्रतीसाद नाही
वॉशिंग्टन : अमेरिकेतील अनेक महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये अल्पसंख्यांक आणि कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होत असून त्याची गंभीर दखल अमेरिकेतील समाजशास्त्रज्ञांनी घेतली आहे.
अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये कृष्णवर्णीय आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी कोट्यावधीच्या कल्याणकारी योजना तयार करण्यात आल्या असूनही त्या योजनांना प्रतिसाद मिळत नसल्याची माहितीही समोर आली आहे. कॅलिफोर्निया आणि मिशिगन या महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये अल्पसंख्यांक आणि कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर घटत चालली आहे.
विद्यापीठांमध्ये कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी 1990च्या कालावधीमध्ये एका विशेष योजनेची घोषणा करण्यात आली होती पण 2004मध्ये ही योजना बंद करण्यात आली त्याचा फटका विद्यार्थ्यांचया ॲडमिशन ला बसला असावा अशी एक शक्यता व्यक्त होत असून 1990 मधील ही योजना पुन्हा एकदा सुरु करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
तशी एक याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून 31 ऑक्टोबरला त्यावर सुनावणी होणार आहे. अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये काही वर्षापूर्वी कृष्णवर्णीय आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची टक्केवारी पंधरा टक्के पेक्षा जास्त होती आज हे प्रमाण तीन टक्क्यापर्यंत कमी झाले आहे.