पुणे -मध्य रेल्वेकडून ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यानच्या 5 आणि 6 व्या मार्गिकेच्या पायाभूत सुविधांचे कामकाज करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उपनगरीय आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. यामध्ये पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्स्प्रेसचादेखील समावेश असून, तीन दिवस या रेल्वे रद्द करण्यात येणार आहेत.
पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (4 ते 7 फेब्रुवारी), मुंबई- पुणे डेक्कन एक्स्प्रेस (5 ते 8 फेब्रुवारी), कोल्हापूर -मुंबई कोयना एक्स्प्रेस (4 ते 6 फेब्रुवारी), मुंबई- कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस (5 ते 7 फेब्रुवारी), मुंबई-पुणे डेक्कन क्वीन (5 ते 7 फेब्रुवारी), मुंबई-गदग-मुंबई एक्स्प्रेस (4 ते 6 फेबुवारी), सिकंदराबाद-एलटीटी एक्स्प्रेस (4 फेब्रुवारी),
एलटीटी-सिकंदराबाद एक्स्प्रेस (5फेब्रुवारी), हुबळी-दादर एक्स्प्रेस (4 ते 6 फेब्रुवारी), दादर-हुबळी एक्स्प्रेस (5 ते 7 फेब्रुवारी) या रेल्वे रद्द करण्यात येणार आहेत. तर मुंबई-हैदराबाद हुसैन सागर एक्स्प्रेस पुणे येहून 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी रवाना होणार आहे. हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी पुणे स्थानकापर्यंत धावणार आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.