पुणे – डेक्कन होंडा शोरूम मध्ये डेक्कन होंडाचे डायरेक्टर, तसेच कंपनीचे सर्व कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये नवीन Honda Elevate चे अनावरण झाले असून, पुणेकरांसाठी आवडती नवीन Honda Elevate उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचे वैशिष्ट म्हणजे हि SUV ‘अर्बन फ्री-स्टाइलर” च्या संकल्पनेवर आधारित असून याची रचना आकर्षक आणि वैशिष्टपूर्ण आहे.
ज्यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड CVT ट्रान्समिशनसह होंडाचे शक्तिशाली आणि पुरस्कृत 1.5Li-VTEC पेट्रोल इंजिन आहे. यामध्ये सर्व श्रेणीच्या प्रवाशांना बसण्यासाठी अतिशय सोयीस्कर आणि प्रशस्त जागा आहे.
यात Honda Sensing च्या ADAS तंत्रज्ञानासह अनेक प्रगत सुरक्षा संबंधित प्रणाली आहेत. याची बाह्य रचना खूपच दमदार, आकर्षक आणि दिमाखदार आहे. यात क्लास लिडिंग 458 लीटर कार्गोस्पेस देण्यात आली आहे.
तसेच, यात 17.78 मिमी (7 इंच) हाय डेफिनेशन फुल कलर टीएफटी मीटर क्लस्टर आहे. यात हाय डेफिनिशन (HD) रिझोल्यूशन 10.25″, LED टच स्क्रीन डिस्प्ले ऑडिओ आणि वायरलेस स्मार्ट चार्जर दिलेला आहे.
W Honda Elevate सिंगल टोन आणि ड्युअल टोन मिळून 10 रंगांच्या प्रभावी निवडीसह उपलब्ध रंग आहेत. तसेच Honda Elevate (ACETM) बॉडी स्ट्रक्चर, 6 एअरबॅग्ज, लेन वॉच कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी आणि ट्रॅक्शन कंट्रोलसह वाहन स्थिरता सहाय्य, हिल स्टार्ट असिस्ट,, मल्टी अँगल टिअर व्ह्यू कॅमेरा, रिअर पार्किंग सेन्सर्ससह सुसज्ज आहे.
याच्या मागील बाजूच्या सीट्स ISOFIX चाईल्ड अंकोरेजेससह तसेच महत्वाचे म्हणजे Honda Elevate चा 15.31 kmpl मॅन्युअल आणि 16.92kmpl* CVT चा सरासरी मायलेज देते आणि इंधनाची बचत करते.