कंबोडिया – सुरुंग आणि स्फोटकं शोधून हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या “मागवा’ उंदराने अखेर जगाचा निरोप घेतला आहे. विशेष म्हणजे, या कामगिरीसाठी त्याला सुवर्ण पदकही मिळाले होते. पाच वर्षाची कारकिर्द पूर्ण करून हा उंदीर जून 2021मध्ये सेवानिवृत्त झाला होता.
मागावा नावाच्या या उंदीराने कंबोडियामध्ये अनेक जिवंत बॉम्ब आणि भूसुरुंग वास घेऊन शोधले होते. मागवा उंदीर स्फोटकांचा वास सव्वीस पटीने अधिक वेगाने घेऊ शकत होता.
या उंदराला नोंदणीकृत असलेल्या अपोपो नावाच्या चॅरिटने प्रशिक्षण दिले होते. ही संस्था टांझानियामधील असून येथे आतापर्यंत अनेक उदरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षित केलेल्या उंदरांना ही संस्था हिरो रॅट म्हणून संबोधते. या संस्थेकडून जमिनीतील सुरुंग शोधून काढण्यासाठी 1990सालापासून उंदरांना प्रशिक्षण दिले जात आहे.
अपोपो संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, मागवा उंदराने गेल्या आठवड्यात शेवटचा श्वास घेतला. मागवा उंदीर पूर्णपणे बरा होता. मात्र, वयोमानानुसार तो थकला होता आणि त्याने खाणेपिणे कमी केले होते. अपोपो संस्थेने प्रशिक्षण दिलेल्या उंदरांपैकी मागवा हा सर्वात यशस्वी उंदीर होता. त्याने सुरुंग शोधण्यासाठी एक वर्षाचे प्रशिक्षण घेतले होते. टेनिस कोर्टच्या आकाराच्या परिसरात फिरून मागावा अवघ्या 30 मिनिटांत बॉम्ब शोधू शकत होता. तिथे पारंपारिक मेटल डिटेक्टरला हे काम करण्यासाठी चार दिवस लागले असते.