कराड – शहराच्या वाढीव भागातील मुजावर कॉलनीत 25 ऑक्टोबर रोजी गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या जोया शरीफ मुल्ला (वय 11) या मुलीचा उपचारादारम्यान गुरुवारी मृत्यू झाला. यापूर्वी जोयाचे वडील शरीफ व आई सुलताना यांचाही मृत्यू झाला होता. स्फोटातील दोन जखमी लहान मुलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यामध्ये राहत मुल्ला (वय 7) हा बरा झाल्याने, त्याला काही दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. जोयावर मिरज येथे उपचार सुरू होते.
मुजावर कॉलनीत शरीफ मुबारक मुल्ला यांच्या घरात 25 ऑक्टोबर रोजी गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात संपूर्ण कुटुंबगंभीर जखमी झाले होते. आजूबाजूच्या चार घरांचे मोठे नुकसान झाले होते. या स्फोटात जखमी झालेल्या शरीफ मुल्ला यांच्या पत्नीचा उपचार सुरू असताना 31 ऑक्टोबर रोजी, तर 3 नोव्हेंबर रोजी शरीफ यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या दोन चिमुकल्यांवर मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. राहत मुल्ला बरा झाल्याने त्याला रुग्णालयातून नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, जोया हिचा गुरुवारी मृत्यू झाला.