स्टॉकहोम – डेव्हिस ज्युलियस आणि आर्डेन पॅटापोटियन यांना यावर्षीचा भौतिकशास्त्र अथवा औषधनिर्माण शास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. शरीराचे तापमान आणि स्पर्शाची संवेदना ओळखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या रिसेप्टरच्या शोधाबद्दल या दोघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
डोळे, कान आणि त्वचेची तपासणी करण्यासाठीच्या सोमॅटोसेन्सेशन या विषयामध्ये या दोन्ही तज्ञांनी विशेष काम केले आहे. नोबेल कमिटीचे सरचिटणीस थॉमस पर्लमॅन यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली. रिसेप्टरच्या शोधामुळे निसर्गाचे एक रहस्य उलगडण्यास मदत झाली आहे. माणसाच्या सजीव राहण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. हा शोध अत्यंत महत्वाचा आणि प्रगल्भ असा आहे, असे ते म्हणाले.
त्वचेवर उष्णतेचा परिणाम अभ्यासण्यासाठी ज्युलियस यांनी मिरचीच्या पावडरमधील कॅप्सॅसिन या घटकाचा वापर केला. तर पॅटोपोटियन यांनी पेशीवरील प्रत्यक्ष दाब ओळखण्यासाठी स्वतंत्र दबाव संवेदनशील सेन्सर विकसित केले. ज्युलियस आणि पॅटोपोटियन या दोघांना गेल्यावर्षी प्रथितयश कावली पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.
नोबेल पुरस्कार म्हणून सुवर्णपदक आणि 10 दशलक्ष स्वीडीश क्रोनोर (1.14 दशलक्ष डॉलर) इतके पारितोषिक देण्यात येणार आहे.