केडगाव -केडगाव (ता. दौंड) येथे आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने तिच्या 36 वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्योती मधुकर वाघमारे (वय 36, रा. पंचरत्न सोसायटी, केडगाव), असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
केडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ज्योती हिच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ती मानसिकदृष्ट्या खचली होती. आईच्या मृत्यूचा तिला विरह सहन झाला नाही. 8 दिवसांपूर्वी तिने राहत्या घरात आत्महत्या केली होती.
त्यानंतर घरातून उग्र वास येऊ लागल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. ती मानसिकदृष्ट्या खचल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.