पुणे – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागाचे प्रमुख दत्तात्रय कळमकर यांचा “बाजार फी’ मध्ये उल्लेखनीय वाढ करून दिल्याबादल बाणेर येथील योगिराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर ,उपाध्यक्ष शंकरराव सायकर, तहसिलदार विकास भालेराव, राजेंद्र मुरकुटे, राजेश विधाते, अमर लोंढे, संजय बालवडकर, सचिन चव्हाण, गणेश तापकीर ,संग्राम मुरकुटे व संचालक मंडळ उपस्थित होते. बाजार फीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल तीन कोटी 40 लाख रुपयांची वाढ झाल्याने हा सत्कार करण्यात आला. योगिराज ही नामांकित पतसंस्था असून, त्यामध्ये तब्बल 102 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.