पालघर – स्वताच्याच दोन अल्पवयीन मुलींवर गेले अनेक दिवस सातत्याने बलात्कार करणाऱ्याला एका पित्याला पालघर पोलिसांनी अटक केली आहे. हा इसम 45 वर्षे वयाचा आहे आणि त्याच्या दोन मुली अनुक्रमे 6 आणि 12 वर्ष वयोगटातील आहेत.
हा प्रकार 2019 सालापासून सुरू आहे. या मुलींच्या आईचे निधन झाले असून या मुलींना चाकुचा धाक दाखवून त्यांच्यावर अत्याचार केले जात होते. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने या मुलांनी आपल्या पित्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.
पीडित मुलींना पोलिसांना सांगितले की, जेव्हा जेव्हा त्यांनी या प्रकरणी विरोध करण्याचा किंवा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या वडिलांच्या अतिप्रसंगाला प्रतिकार केला तेव्हा तो त्यांना चाकुचा धाक दाखवून धमकवायचा.त्यांना जीवे मारण्याची धमकी द्यायचा, असे भोईसर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.
त्यांच्या आईच्या निधनानंतर 2019 पासून हा प्रकार सुरू होता.या मुलींच्या मोठ्या बहिणींचे लग्न झाले असून ती दुसरीकडे राहात आहे. पोलिसांनी आता आरोपीवर पोस्को म्हणजेच बाल लैंगिक शोषण विरोधी कायद्यासह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.