पौड – मुळशी तहसिल कार्यालय पौड येथील आवारात मुळशीतून शासकीय कामासाठी नागरिक, महिला, वृध्द येत असतात. मात्र तहसिल आवारात असणारे कार्यालये पोलीस पाटील भवन, दुय्यम निबंधक कार्यालय, निवडणूक शाखा या समोर असणारे तारा बऱ्याच दिवसापासून लोंबकळत आहेत.
या इतक्या खाली लोंबल्या आहेत की त्यापासून एखादी दुर्घटना होऊ शकते. आज शनिवार असल्याने नागरिकांची वर्दळ नाही, परंतु तहसिल आवारातील अनावश्यक असणाऱ्या तारा वायरी या काढून टाकण्याची आवश्यकता आहे.
तहसिल आवारात विविध कार्यालय असून यामध्ये रोज कामकाज सुरू असते. परंतु तहसिल आवारातील लोंबणाऱ्या तारा, केबल वायर, मात्र दुर्लक्षित होताना दिसत आहे तहसिल कचेरी आवारातील लोंबणाऱ्या तारा, वायरी, याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.