वाघोली – महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या सूचनेनुसार मंडल दिनाचे औचित्य साधुन संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी केंद्र सरकारचा ओबीसी समाजाच्या राजकिय आरक्षणाविरोधात भूमिकेच्या निषेधार्थ वाघोली येथे पुणे जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे यांच्या नेतृत्वाखाली श्री संत शिरोमणी सावता माळी यांना अभिवादन करुन धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने २०११ मध्ये केलेल्या जातनिहाय जणगणनेची आकडेवारी इंपेरीकल डाटा राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा, ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे अशा मागण्या मांडण्यात आल्या.
यावेळी पुणे जिल्हा ओबीसी सेल कार्याध्यक्ष अतुल राऊत, माजी जि. प. सदस्य रामदास दाभाडे, वाघोली गावच्या सरपंच वसुंधरा उबाळे, जिल्हा मुख्य संघटक संजय जकाते, हवेली तालुका अध्यक्ष सुभाष टिळेकर, मावळ उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, माजी उपसरपंच राजेंद्र सातव, माजी सदस्य बाळासाहेब सातव, माजी उपसरपंच कविता दळवी, कलावती शिवरकर, कोथरुड विधानसभा अध्यक्षा राखी श्रीराव, विठ्ठल शिवरकर, दशरथ भाडळे, किसन महाराज जाधव, बाळासाहेब शिंदे, अरुण ननावरे, सोशल मीडिया प्रमुख प्रथमेश घाग, राहिल तांबोळी, दत्तात्रय कटके, सोपान गोरे, संदिप थोरात,संतोष राऊत, दशरथ पाचारणे, सुनील शिवरकर, आप्पा दळवी व इतर मान्यवर उपस्थित होते.