बंगलुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपल्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप केले आहे. यातील बहुतेक मंत्र्यांना त्यांची जुनीच खाती परत मिळाली आहेत. तथापि यातील काही नव्या मंत्र्यांना महत्वाची खाती मिळाली आहेत. त्यात अरग जनेंद्र यांना गृह खाते मिळाले असून व्ही सुनिल कुमार यांना उर्जा खाते मिळाले आहे.
मुख्यमंत्री बोम्मई यांनी स्वत:कडे प्रशासकीय सुधारणा, अर्थ, गुप्तचर, कॅबिनेट अफेअर्स ही खाती ठेवली आहेत. बंगलुरू शहर विकास प्रकल्पांशी संबंधीत खातेही त्यांनी स्वत:कडेच ठेवले आहे. मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट करण्यात आलेले बी.सी. नागेश यांच्याकडे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खाते देण्यात आले आहे.
या आधी हे खाते सुरेशकुमार यांच्याकडे होते. त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही. गोविंद करजोल, सीसी पाटील, बी. श्रीमालू, मुरूगेश निरानी यांना त्यांची जुनी खातीच देण्यात आली आहेत.