चांगल्या दर्जाचे तंतुमय पदार्थ दलियात असल्यामुळे पोट लवकर भरतं. सारखी-सारखी भूक लागत नाही. त्यामुळे ज्यांना वारंवार भूक लागते त्यांनी दलियापासून बनवलेले पदार्थ खाण्यास काहीच हरकत नाही.
साहित्य : १ वाटी दलिया, अर्धी वाटी चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक कापलेले गाजर आणि फरसबी, वाटाणे, फोडणीसाठी १ चमचा तेल, राई, हळद, हिंग, मिरची आणि कढीपत्ता, एका अख्ख्या लिंबाचा रस, गूळ, चवीपुरतं मीठ, ओलं खोबरं.
कृती : दलिया निवडून खरपूस खमंग भाजून घ्याव्यात. थंड झाल्यावर त्या धुवून निथळत ठेवाव्यात. एका प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करून त्यात राई, हिंग, हळद, मिरची आणि कढीपत्ता टाकून फोडणी करावी. त्यावर कांदा परतून घ्यावा. कांदा गुलाबीसर परतल्यानंतर त्यात इतर भाज्याही परतून घ्याव्यात. भाज्या अर्ध्या कच्च्या शिजत आल्यावर त्यात दलिया घालाव्यात. ते मिश्रण चांगले परतून घ्यावे. चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा दलिया परतून घ्याव्यात. परतलेल्या दलियात दीड कप पाणी घालून तीन ते चार शिट्टया काढून द्याव्यात. तयार उपम्यावर लिंबाचा रस, कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून तो सव्र्ह करावा.
टीप्स : याचप्रमाणे दलियाचा पुलावही करता येईल.
फायदे : चांगल्या दर्जाचे तंतुमय पदार्थ दलियात असल्यामुळे पोट लवकर भरतं. सारखी-सारखी भूक लागत नाही. त्यामुळे ज्यांना वारंवार भूक लागते त्यांनी दलियापासून बनवलेले पदार्थ खाण्यास काहीच हरकत नाही. म्हणूनच तर वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेही लोकांसाठी दलिया तसंच दलियापासून बनवलेले पदार्थ केव्हाही चांगले. वजन कमी करायचं असल्यास आठवडयातून तीन ते चार वेळा रात्रीच्या जेवणात दलियाचा उपमा गोडय़ा ताकाबरोबर खाणं उत्तम. या दलियात मोड आलेली कडधान्यं घातल्यास तो अधिक रुचकर लागतो.