जळोची- बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्रांची तपासणी करण्यासाठी राज्याचे परिवहन आयुक्त व उपआयुक्त यांनी शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देऊनही त्यांच्या आदेशाला बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाटाण्याच्या अक्षदा दाखवण्यात आल्या होत्या. त्याची बातमी दैनिक प्रभात मध्ये प्रसिद्ध होताच दैनिक प्रभातच्या दनक्याने बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून बारामती, दौंड, इंदापुर या तीन तालुक्याच्या वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्रांची तपासणी करण्याच्या कोट्यामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. दररोजचा कोटा 25 होता. तो आता दैनिक प्रभातच्या दनक्याने 50 करण्यात आला आहे.
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक यांचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात असतानाही वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्रांची ऑनलाईन अपायमेंट एक ते दोन महिन्यानंतरची मिळत होती.याबाबतची माहिती राज्याचे परिवहन आयुक्त यांना दिल्या नंतर त्यांनी व राज्याचे उपआयुक्त यांनी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधुन समंधीत अधिकारी यांना सुट्टीच्या दिवशी शनिवार व रविवार रोजी वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्राची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.तरी सुद्धा सुट्टीच्या दिवशी शनिवारी व रविवारी येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी राज्याचे परिवहन आयुक्त व उपआयुक्त यांनी आदेश देऊनही बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकड़ून वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्रांची तपासणी का ? करण्यात आली नाही.हे मात्र वाहन मालक,चालक यांना समजु शकलेले नाही.
या उलट मात्र एक्सेप्ट मध्ये विना अपायमेंट असणाऱ्या त्यांच्या खास ठराविक समंधीतांच्या वाहनांची तपासणी करावयाची असल्यास व त्या वाहनांची कसलिही ऑनलाईन अपायमेंट नसताना सुद्धा व वाहन कितीही खराब असो, त्या वाहनाचे टायर गोटा झालेले असो,किंवा एखाद्या वाहनाचे नॅशनल परमिटचे एबीएसचे किट नसो, तरी सुद्धा त्या वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्राची तपासणी करुण त्याचे फिटनेस सर्टिफिकेट तत्काळ दिले जात होते.व त्या करीता दुपार नंतर एका मोटार वाहन निरिक्षकांची नियुक्ती बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालायातुन केली जात होती.व वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची तपासणी करुण दिली जात होती.असे या कोरोना संकटात भरकटुन निघालेले वाहन मालक,चालक सांगतात.
राज्याचे परिवहन आयुक्त व उपआयुक्त यांनी मंगळवार दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रत्यक्ष फोनवर समंधीत अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन सुट्टीच्या दिवशी शनिवार व रविवार रोजी वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्राची तपासणी करण्याचे आदेश देऊनही शनिवारी दिनांक 21 जानेवारी व रविवारी दिनांक 22 जानेवारी रोजी वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्राची तपासणी करण्यात आली नाही. राज्याचे परिवहन आयुक्त व उपआयुक्त यांनी दिलेल्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा दाखवल्या जात असल्याचे वाहन मालक,चालक सांगतात.मात्र दैनिक प्रभातच्या दनक्याने वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्राची तपासणी करण्याच्या कोठयामध्ये दुपटीने वाढ करण्यात आल्याने वाहन मालक चालकांनी दैनिक प्रभातचे आभार मानले.