कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. संजय चव्हाण यांना केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातंर्गत सायन्स अँड इंजिनीअरिंग रिसर्च बोर्ड (सर्ब) यांच्याकडून तीस लाख २० हजार रुपयांचा संशोधन प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यांना या संबंधीचा ई मेल प्राप्त झाला आहे.
चव्हाण यांनी, ’डिझाइन अँड सिन्थेसिस ऑफ कार्बन रिच अल्कीनील फंक्शनलाइज्ड ट्रांझिशन मेटल कॉम्प्लेक्सेस फॉर देअर लुमिनिसेन्स अँड नॉन-लिनिअर ऑप्टिकल प्रॉपर्टीज’ या विषयावरील प्रकल्पाचा प्रस्ताव भारत सरकारच्या ‘सायन्स अँड इंजिनीअरिंग रिसर्च बोर्ड’यांना सादर केला होता.