25 कोटी वर्षापूर्वीच्या महाकाय प्राण्यांचे अवशेष असल्याची शक्यता
वॉशिंग्टन : अमेरिकेत सुरू असलेल्या उत्खननामध्ये तब्बल साडेसहा फूट लांबी आलेल्या एका प्राण्याची कवटी सापडली असून अशा प्रकारचे पाणी 25 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे हे प्राणी डायनासोरसदृश्य दिसत आहेत.
आतापर्यंत सापडलेल्या महाकाय प्राण्यांच्या अवशेषांमधील हा सर्वात मोठा अवशेष मानला जात आहे. पृथ्वीवर अस्तित्वात असलेला हा एक सर्वात मोठा प्राणी असावा अशी शक्यता ही व्यक्त केली जात आहे. नेवाडा प्रांतात उत्खनन सुरू असताना या प्राण्याचे अवशेष सापडले असून हा एक समुद्री जीव असावा असा अंदाज आहे. या प्राण्याची एकूण लांबी तब्बल वीस मीटर पेक्षा जास्त म्हणजेच 65 फुटांपेक्षा जास्त असावी असे त्याच्या एकूण कवटीच्या आकारावरुन अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
प्राण्याच्या कवटीची एकंदरीत रचना मानवी कवटीशी साधर्म्य साधणारी आहे. पृथ्वीवर सर्वात प्रथम आपले साम्राज्य स्थापन करणाऱ्या काही प्राण्यांपैकी हा एक जीव असावा असंही शास्त्रज्ञांना वाटत आहे.नेवाडातील ऑगस्टा येथे ही कवटी सापडली असून हा जीव इचितोसोर नावाने प्रसिद्ध आहे. समुद्रावर तब्बल पंधरा कोटी वर्षे राज्य करणाऱ्या या प्राण्याची वाढ वेगाने होत असल्याने त्याची लांबी आणि रुंदी खूप मोठी होती.
या प्रकारचे प्राणी विविध आकारांचे असले तरी सर्वात जास्त लांबीचा प्राणी हा तब्बल 20 मीटर लांब म्हणजेच 65 फुटाच्या आसपास असावा अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. ही एक महत्त्वाची कवटी आता शास्त्रज्ञांच्या हाती लागल्याने पंचवीस कोटी वर्षांपूर्वीच्या पृथ्वीवरील जीवसृष्टीबाबत काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.